14 मंग जवळपास अर्धा सण व्हवानंतर येशु मंदिरमा जाईन शिकाडु लागना. 15 यावरतीन यहूदी लोकसले आश्चर्य वाटनं अनी त्या बोलनात, "हाऊ माणुस बिना शिक्षण लेता कसा काय ईतला ज्ञानी व्हई गया?"
16 येशुनी त्यासले उत्तर दिधं, "मनी शिकवण हाई मनी नही, तर ज्यानी माले धाडेल शे, त्या देवनी शे. 17 त्याना ईच्छाप्रमाणे करानं अस जर कोणी मनमा आनं तर हाई शिकवणबद्दल त्याले समजी की, हाई देवपाईन शे की मी मना मननं बोली राहीनु. 18 जो आपला मननं बोलस तो स्वतःनं गौरव करी लेवाले दखस; पण आपले ज्यानी धाडेल शे त्याना गौरव जो दखस तो खरा शे, अनी त्यामा काहीच अधर्म नही शे.