59 मंग आठवा दिन असं व्हयनं की, बाळनी सुंता कराकरता त्या वनात, अनी त्याना बापना नाववरतीन त्यानं नाव जखऱ्या ठेवणार व्हतात. 60 पण त्यानी मायनी सांगं, "नही! त्यानं नाव योहान ठेवनं शे."
61 त्या तिले बोलणात, "तुना नातलगसमा हाई नाव कोणच नही शे!" 62 त्यासनी त्याना बापले इशारा करीसन ईचारं, तुनी काय ईच्छा शे त्यानं नाव काय ठेवानं.
63 मंग त्यानी पाटी मांगाडीन त्यानं नाव योहान शे अस लिखं, तवय सर्वासले आश्चर्य वाटणं. 64 त्याच येळले लगेच त्यानं तोंड उघडनं, त्यानी जिभ मोकळी व्हयनी अनी तो देवना आभार मानीन बोलाले लागना.