32 तवय पेत्र अनं त्यानासंगेना लोके गाड झोपमा व्हतात, तरी त्यासनी जागं व्हईन त्यानं रूप अनं त्यानाजोडे उभा राहेल त्या दोन्ही माणससले दखं. 33 मंग अस व्हयनं की त्या येशु कडतीन जाई राहींतात तवय पेत्रनी येशुले सांगं, प्रभु, आपण आठे राहसुत हाई बरं व्हई! तर आपण तीन मंडप बनाडु, एक मोशेकरता अनं एक एलियाकरता, हाई जे तो बोलना यानं त्याले भान नव्हतं.