येशु बराच लोकसले बरं करस
29 मंग येशु सभास्थानमातीन निंघीसन लगेच याकोब अनी योहान यासनासंगे शिमोन अनं आंद्रिया यासना घर गया. 30 शिमोननी सासु तापमा ती खाटवर झोपेल व्हती तिनाबद्दल लगेच त्यासनी येशुले सांगं. 31 तवय येशु तिनाजोडे गया, त्यानी हात धरीन तिले ऊठाडं, लगेच तिना ताप निंघी गया अनं ती त्यासनी सेवा कराले लागनी.