22 याईर नावना एक सभास्थानना अधिकारी तठे वना अनं येशुले दखीसन त्याना पाया पडना. 23 तवय तो येशुले कळकळ करीसन ईनंती करू लागना की, "मनी धाकली पोर मराले टेकेल शे. ती वाचाले पाहिजे म्हणीसन तुम्हीन ईसन तिना डोकावर हात ठेवा!"
24 मंग येशु त्यानासंगे जावाले निंघना तवय लोकसनी मोठी गर्दी बी त्याना मांगे निंघनी. अनी त्यासनी त्याना आजुबाजू गर्दी करी.