25 ती गर्दीमा एक बाई व्हती तिले बारा वरीस पाईन रक्तस्रावना आजार व्हता, 26 तिनाजोडे व्हतं नव्हतं तितलं सगळंच खर्चाई जायल व्हतं. तिले बराच तरास व्हता म्हणीन तिनी वैद्यसकडतीन ईलाज करा तरी फरक पडना नही, उलटा आजार जास्तीज वाढी जायेल व्हता. 27 ती येशु बद्दलन्या गोष्टी ऐकीसन त्या गर्दीमा घुसनी अनी त्यानाकडे ईसन त्याना कपडासले हात लाया, 28 कारण ती सांगे, "मी याना कपडासले जरी हात लावसु तरी बरी व्हसु."
29 तवय लगेच तिना रक्तस्राव बंद व्हई गया अनं तिना शरिरले जानवणं मी या आजारपाईन मुक्त व्हई जायल शे.