9 आखो येशु त्यासले बोलना, "तुम्हीन आपला रितीरिवाज पाळाकरता देवनी आज्ञा मोडाना चांगलाच मार्ग शोधी काढेल शे! 10 कारण मोशेनी अशी आज्ञा देयेल शे की, ‘आपला बाप अनी माय यासना मान राख,’ अनी, ‘जो कोणी बाप किंवा मायनी निंदा करी त्याले मारी टाका.’ 11 पण तुम्हीन म्हणतस जर कोणी आपला माय बापले अस सांगतस की, मी तुमले मदत करतु पण जे मनाकडे शे, ‘ते मी देवले अर्पण कराले ठेयेल शे.’ 12 तर त्याले आपला माय किंवा बापले मदत नही करानं कारण भेटी जास. 13 तसच तुम्हीन आपला रितीरिवाज चालु ठेवाकरता देवनं वचन मोडतसं अनी असा बऱ्याच गोष्टी करतस."