स्वतःना मृत्यु अनं पुनरूत्थानबद्दल येशुनी करेल भविष्य
21 त्या येळपाईन येशु त्याना शिष्यसले सांगु लागना, हाई व्हवानं आवश्यक शे की, "मी यरूशलेमले जासु वडील लोके, मुख्य याजक अनं शास्त्री यासनाकडतीन मना भलता छळ व्हई, माले मारी टाकतीन अनं तिसरा दिनले मी परत जिवत व्हसू."