28 १८:२८ (एक चांदीना शिक्का) (एकदिनार) एक दिननी मजुरी.तो सेवक बाहेर गया अनी ज्यानाकडे त्याना शंभर दिनार रूपया बाकी व्हतात असा त्याना जोडीना सेवक त्याले दखायना, तवय त्यानी त्या सेवकनी गचांडी धरीन बोलना, तुनाकडे मनं जे लेणं शे ते दे. 30 पण त्यानी त्यानं अजिबात ऐक नही तो कर्ज फेडत नही तोपावत त्यानी त्याले बंदिगृहमा टाकी दिधं.