6 तु जवय प्रार्थना करस, तवय तू आपला खोलीमा जाईसन दार लाव, अनी आपला गुप्तवासी पितानी प्रार्थना कर, म्हणजे तूना गुप्तवासी पिता तुले फळ दि. 7 तुम्हीन जवय प्रार्थना करतस तवय गैरयहूदीस मायक बिनकामनं बडबड करू नका, आपण बराच बोलनुत म्हणीसन आपली मागणी मान्य व्हई अस त्यासले वाटस.