3 घोडासनी आपली आज्ञा पाळायला पाहिजे म्हणीसन आपण त्याना तोंडमा लगाम लावतस त्यामुये त्याले जठे पाहिजे तठे आपले फिरावता येस. 4 जहाजसंले बी दखा त्या ईतला मोठा शेतस अनं मोठा वाराघाई लोटाई जातस, तरी चालवणारानी ईच्छा ऱ्हास तिकडे तो त्याले फिरावस. 5 तशीच जिभ बी धाकलस अवयव व्हईसन बी मोठ्या गोष्टीसनी फुशारकी मारस.
तर ईचार करा, कितला धाकला ईस्तव कितला मोठा जंगलले चेटाडस. 6 जिभ बी आग शे, ती अनितीनं भुवन शे, आपला अवयवात सर्व शरीर मळीन करनारा अवयव जिभ शे, ती बहुचक्रले आग लावणारी अनी नरकघाई चेटाडेल अशी शे. 7 श्वापदे, पक्षी, सरपटणारा प्राणी अनी समुद्रमाधला जीव या प्रत्येकना स्वभाव मनुष्य स्वभावना ताबामा व्हयेल शेतस, अनी व्हई राहीनात, 8 पण मनुष्यसपैकी कोणी बी जिभले ताबामा कराकरता समर्थ नही, ती शांतीरहीत शे अनी दुष्ट शे अनं प्राणघातक विषघाई भरेल शे.