ख्रिस्ती मंडळीतील पक्षाभिमानाची वृत्ती
10 तर आता, बंधूनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही सर्वांनी एकमेकांशी सारख्या मनाने एकत्र व्हावे आणि तुमच्यात मतभेद असू नयेत, तर तुम्ही एकाच हेतूने परिपूर्ण व्हावे. 11 कारण माझ्या बंधूनो ख्लोवेच्या मनुष्यांकडून मला असे कळविण्यात आले की, तुमच्यात भांडणे आहेत. 12 माझे म्हणणे असे आहे की तुमच्यातील प्रत्येकजण म्हणतो, "मी पौलाचा आहे." "मी अपुल्लोचा आहे," "मी केफाचा आहे," "मी ख्रिस्ताचा आहे." 13 ख्रिस्त विभागला गेला आहे का? पौल वधस्तंभावर तुमच्यासाठी खिळला गेला होता का? पौलाच्या नावाने तुमचा बाप्तिस्मा झाला का?