Pular para o conteúdo
Publicidade

1 करिंथकरांस 1:10-13

OMRCV Marathi Contemporary Version

पुढाऱ्यांवरून मंडळीत फूट

10 माझ्या प्रिय बंधूंनो व भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावास्तव मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही जे काही बोलता त्यामध्ये एकमत असावे, म्हणजे तुमच्यामध्ये फूट पडू नये, मनाने आणि विचाराने तुम्ही सर्व एकतेमध्ये परिपूर्ण असावे. 11 कारण बंधूंनो व भगिनींनो, तुम्हामध्ये भांडणे आहेत, असे मला ख्लोवेच्या घरातील काही लोकांनी सांगितले आहे. 12 माझ्या म्हणण्याचा अर्थ हा: तुमच्यातील एकजण म्हणतो, "मी पौलाचा अनुयायी आहे," तर कोणी "मी अपुल्लोसाचा" आणखी कोणी "मी केफाचा1:12 म्हणजे पेत्राचा अनुयायी आहे," आणखी कोणी "मी ख्रिस्ताचा अनुयायी आहे."

13 ख्रिस्त विभागले गेले आहेत का? तुमच्यासाठी पौलाला क्रूसावर दिले होते का? तुमचा बाप्तिस्मा पौलाच्या नावात झाला होता का?

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    10 तर आता, बंधूनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही सर्वांनी एकमेकांशी सारख्या मनाने एकत्र व्हावे आणि तुमच्यात मतभेद असू नयेत, तर तुम्ही एकाच हेतूने परिपूर्ण व्हावे. 11 कारण माझ्या बंधूनो ख्लोवेच्या मनुष्यांकडून मला असे कळविण्यात आले की, तुमच्यात भांडणे आहेत. 12 माझे म्हणणे असे आहे की तुमच्यातील प्रत्येकजण म्हणतो, "मी पौलाचा आहे." "मी अपुल्लोचा आहे," "मी केफाचा आहे," "मी ख्रिस्ताचा आहे." 13 ख्रिस्त विभागला गेला आहे का? पौल वधस्तंभावर तुमच्यासाठी खिळला गेला होता का? पौलाच्या नावाने तुमचा बाप्तिस्मा झाला का?

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.