6 आणि या गोष्टी आमच्यासाठी उदाहरण म्हणून घडल्या, कारण ज्याप्रमाणे त्यांनी वाईट गोष्टींची अपेक्षा केली, त्याप्रमाणे आपण वाईटाची इच्छा धरणारे लोक होऊ नये. 7 त्यांच्यापैकी काहीजण मूर्तीपुजक होते तसे होऊ नका. पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे, "लोक खाण्यापिण्यास खाली बसले आणि ते मूर्तीसमोर शरीरासंबंधाच्या हेतूने नाच करण्यासाठी उठले." 8 ज्याप्रमाणे त्यांच्यातील काहीजणांनी केले तसे व्यभिचार आपण करू नये. त्याचा परिणाम असा झाला की, एका दिवसात तेवीस हजार लोक मरण पावले. 9 आणि त्यांच्यातील काहीजणांनी पाहिली तशी आपण ख्रिस्ताची परीक्षा पाहू नये. याचा परिणाम असा झाला की, ते सापांकडून मारले गेले. 10 कुरकुर करू नका, ज्याप्रमाणे त्यांच्यातील काहीजणांनी केली, याचा परिणाम असा झाला की, ते मृत्युदूताकडून मारले गेले. 13 जे मनुष्यास सामान्य नाही अशा कोणत्याही परीक्षेने तुम्हास घेरले नाही. परंतु देव विश्वसनीय आहे. तुम्हास सहन करता येते त्यापलीकडे तो तुमची परीक्षा घेणार नाही. परंतु त्या परीक्षेबरोबर, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तयार करील. म्हणजे तुम्हास सहन करणे शक्य होईल.
करिंथकरांस पहिले पत्र 10:6-10,13
Em outras traduções
- OMRCV Marathi Contemporary Version
6 आता ज्यागोष्टी घडल्या, त्या आपल्याला उदाहरणादाखल आणि आपण त्यांच्याप्रकारे आपली हृदये वाईट गोष्टींवर केंद्रित करू नयेत म्हणून घडल्या. 7 त्यांच्यातील काही मूर्तिपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका. असे लिहिले आहे: "लोकांनी बसून खाणेपिणे केले व उठून चैनबाजीची मजा घेऊ लागले."10:7 निर्ग 32:6 8 त्याचप्रमाणे त्यांच्यातील काही लोकांनी लैंगिक अनीतीला वाव दिला, तसे आपण करू नये आणि एका दिवसात तेवीस हजार लोक मरण पावले. 9 आपण ख्रिस्ताची10:9 किंवा प्रभूची परीक्षा पाहू नये, जशी त्यांच्यातील काहीजणांनी पाहिली आणि ते सर्पदंशाद्वारे मरण पावले. 10 आणि कुरकुर करू नका, जशी त्यांच्यापैकी काहींनी केली आणि ते नाश करणार्या दूताच्या हातून मरण पावले.
13 मनुष्यमात्रावर येणार्या सर्वसाधारण परीक्षेपेक्षा वेगळी परीक्षा तुम्हावर आलेली नाही आणि परमेश्वर विश्वासू आहेत; ते तुमच्या सहनशक्तीपलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाहीत. तुम्ही ते सहन करण्यास समर्थ व्हावे म्हणून परीक्षा आली असताना त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सिद्ध करतील.
Direitos das traduções citadas
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.