6 आता ज्यागोष्टी घडल्या, त्या आपल्याला उदाहरणादाखल आणि आपण त्यांच्याप्रकारे आपली हृदये वाईट गोष्टींवर केंद्रित करू नयेत म्हणून घडल्या. 7 त्यांच्यातील काही मूर्तिपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका. असे लिहिले आहे: "लोकांनी बसून खाणेपिणे केले व उठून चैनबाजीची मजा घेऊ लागले."10:7 निर्ग 32:6 8 त्याचप्रमाणे त्यांच्यातील काही लोकांनी लैंगिक अनीतीला वाव दिला, तसे आपण करू नये आणि एका दिवसात तेवीस हजार लोक मरण पावले. 9 आपण ख्रिस्ताची10:9 किंवा प्रभूची परीक्षा पाहू नये, जशी त्यांच्यातील काहीजणांनी पाहिली आणि ते सर्पदंशाद्वारे मरण पावले. 10 आणि कुरकुर करू नका, जशी त्यांच्यापैकी काहींनी केली आणि ते नाश करणार्या दूताच्या हातून मरण पावले.
13 मनुष्यमात्रावर येणार्या सर्वसाधारण परीक्षेपेक्षा वेगळी परीक्षा तुम्हावर आलेली नाही आणि परमेश्वर विश्वासू आहेत; ते तुमच्या सहनशक्तीपलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाहीत. तुम्ही ते सहन करण्यास समर्थ व्हावे म्हणून परीक्षा आली असताना त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सिद्ध करतील.