अशुद्धता ही ख्रिस्ती मनुष्याच्या जीवनक्रमाशी विसंगत होय
12 "सर्व गोष्टी मला कायदेशीर आहेत," पण सर्व गोष्टी माझ्या हिताच्या नसतात, "सर्व गोष्टी मला कायदेशीर आहेत," पण मी त्यातील कोणत्याच गोष्टींच्या अधीन होणार नाही. 13 अन्न पोटासाठी आहे आणि पोट अन्नासाठी आहे पण देव त्या दोघांचाही नाश करील. पण व्यभिचारासाठी शरीर नाही, तर शरीर प्रभूसाठी आहे आणि शरीरासाठी प्रभू आहे.