Pular para o conteúdo
Publicidade

1 इतिहास 14

1 नंतर सोराचा राजा हिराम याने दावीदाकडे दूत पाठवले आणि याखेरीज त्याने गंधसरूचे लाकडे, गवंडी, सुतार दाविदासाठी त्याने घर बांधले. 2 तेव्हा, परमेश्वराने आपल्याला इस्राएलावर राजा केले आहे हे दावीदाला समजले आणि इस्राएलाच्या लोकांसाठी देवाने त्याचे राज्य उंचावले.

यरूशलेमेत जन्मलेली दाविदाची मुले

3 यरूशलेम मधल्या आणखी काही स्त्रियांशी दावीदाने लग्ने केली. आणि तो आणखी पुत्र पौत्राचा पिता झाला. 4 यरूशलेमेमध्ये जन्मलेल्या त्याच्या या मुलांची नावे अशी: शम्मुवा, शोबाब, नाथान, शलमोन, 5 इभार, अलीशवा, एल्पलेट, 6 नोगा, नेफेग. याफीय, 7 अलीशामा, बेल्यादा, अलीफलेट.

दावीद पलिष्टयांचा पराभव करतो

2 शमु. 5:17-25

8 आता सर्व इस्राएलावर राजा होण्यासाठी दावीदाला अभिषेक केला आहे हे पलिष्ट्यांना जेव्हा कळाले तेव्हा ते दावीदाचा शोध करायला निघाले. पण दावीदाला ही बातमी कळाली तेव्हा तो त्यांच्याशी लढायला निघाला. 9 आणि पलिष्ट्यांनी रेफाईमच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांवर छापे मारून त्यांना लुटले.

10 मग दावीदाने देवाला विचारले. तो म्हणाला, "पलिष्ट्यांवर मी हल्ला करु काय? मला तू त्यांच्यावर जय देशील काय?" परमेश्वराने त्यास सांगितले "हल्ला कर, मी त्यांना तुझ्या हाती नक्कीच देईन." 11 मग दावीद आणि त्याची माणसे बालपरासीम येथपर्यंत जाऊन पोचली आणि तेथे त्यांने त्यांचा पराभव केला. तो म्हणाला, "देव पुराच्या पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या हाताने माझ्या शत्रूवर तुटून पडला आहे." त्याठिकाणाचे नाव बाल-परासीम असे पडले आहे. 12 पलिष्ट्यांनी आपले देव तिथेच टाकले. आणि दावीदाने त्या मूर्ती जाळून टाकण्याची आज्ञा दिली.

13 रेफाईमच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांवर पलिष्ट्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला. 14 दावीदाने पुन्हा देवाला मदतीसाठी विचारले. देव त्यास म्हणाला "तू त्यांच्यावर हल्ला करायला जाशील तेव्हा समोरुन जाऊ नकोस तर वळसा घेऊन तुतीच्या झाडांसमोर त्याच्यावर चालून जा.

15 तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून तुला सैन्य चाल करून जाण्याचा आवाज ऐकशील तेव्हा लढाईला पुढे निघून जा. कारण देव पलिष्ट्यांवर हल्ला करायला पुढे निघाला आहे." 16 दावीदाने देवाच्या सांगण्याप्रमाणे केले. दावीदाने आपल्या लोकांसह पलिष्ट्यांचा पाडाव केला. गिबोनापासून गेजेरपर्यंत त्यांनी पलिष्ट्यांच्या सैन्याला झोडपून काढले. 17 त्यामुळे दावीदाची कीर्ती सर्व देशात पसरली. परमेश्वराने सर्व राष्ट्रात त्याची दहशत निर्माण केली.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.