Pular para o conteúdo
Publicidade

पेत्राचे पहिले पत्र 1:13-16

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

ख्रिस्तशिष्यांना शोभेसे शील

13 म्हणून तुम्ही आपल्या मनाची कंबर कसून सावध रहा आणि येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी तुमच्यावर जी कृपा होणार आहे तिच्यावर पूर्ण आशा ठेवा. 14 तुम्ही आज्ञांकित मुले होऊन, तुमच्या पूर्वीच्या अज्ञानातील वासनांप्रमाणे स्वतःला वळण लावू नका. 15 परंतु तुम्हास ज्याने पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही आपल्या सर्व वागण्यात पवित्र व्हा. 16 कारण असे जे पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, "तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे."

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    13 म्हणून येशू ख्रिस्त प्रकट होतील तेव्हा तुम्हाला दिल्या जाणार्‍या कृपेवर सावध अंतःकरणाने आणि संपूर्ण विचारशीलतेने तुमची आशा ठेवा. 14 आज्ञांकित मुलांसारखे व्हा आणि अज्ञानपणातील वाईट इच्छेला अनुसरून जसे तुम्ही पूर्वी जगत होता तसे आता जगू नका. 15 परंतु ज्यांनी तुम्हाला पाचारण केले ते जसे पवित्र आहेत, तसेच तुम्हीही जे काही करता त्यांच्यामध्ये पवित्र असा. 16 कारण शास्त्रलेखात असे लिहिले आहे, "तुम्ही पवित्र असावे, कारण मी पवित्र आहे."1:16 लेवी 11:44, 45; 19:2

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.

1 Pedro
Ver todos os capítulos de 1 Pedro