पवित्र व्हा
13 म्हणून येशू ख्रिस्त प्रकट होतील तेव्हा तुम्हाला दिल्या जाणार्या कृपेवर सावध अंतःकरणाने आणि संपूर्ण विचारशीलतेने तुमची आशा ठेवा. 14 आज्ञांकित मुलांसारखे व्हा आणि अज्ञानपणातील वाईट इच्छेला अनुसरून जसे तुम्ही पूर्वी जगत होता तसे आता जगू नका. 15 परंतु ज्यांनी तुम्हाला पाचारण केले ते जसे पवित्र आहेत, तसेच तुम्हीही जे काही करता त्यांच्यामध्ये पवित्र असा. 16 कारण शास्त्रलेखात असे लिहिले आहे, "तुम्ही पवित्र असावे, कारण मी पवित्र आहे."1:16 लेवी 11:44, 45; 19:2