18 म्हणजे तुमच्या मनाचे डोळे प्रकाशित होऊन तुम्हास हे समजावे की, त्याच्या बोलवण्याच्या आशेची निश्चितता काय आहे, त्याच्या वतनाच्या गौरवाची संपत्ती पवित्र लोकात किती आहे, 19 आणि आपण जे विश्वास ठेवणारे त्या आपल्यासाठी त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय ते तुम्ही त्याच्या शक्तीशाली पराक्रमाच्या कामावरून ओळखून घ्यावे.