इस्त्राएली मुलांच्या हत्येचा कट
15 मग मिसराचा राजा इब्री सुइणींशी बोलला. त्यांच्यातल्या एकीचे नाव शिप्रा व दुसरीचे पुवा असे होते. 16 तो म्हणाला, "तुम्ही इब्री स्त्रियांचे बाळंतपण करत असता, त्या प्रसूत होण्याच्या जागी त्या बसल्या म्हणजे नीट पाहा, आणि त्या स्त्रियांना मुलगी झाली तर तिला जिवंत ठेवा; परंतु त्यांना मुलगा झाला तर त्यास अवश्य मारून टाका." 17 परंतु त्या इब्री सुइणी देवाचे भय व आदर धरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या होत्या, म्हणून त्यांनी मिसरी राजाची आज्ञा मानली नाही; तर त्यांनी जन्मणाऱ्या मुलांनाही जिवंत ठेवले.