15 इजिप्तच्या राजाने शिफ्राह व पुआह नावाच्या दोन इब्री सुइणींना अशी सूचना दिली की, 16 "इब्री स्त्रियांची प्रसूतीच्या तिवईवर मदत करीत असताना जर मुलगा जन्मला तर त्याला मारून टाका, परंतु मुलगी असली तर तिला जगू द्या." 17 पण त्या सुइणी परमेश्वराचे भय धरणार्या होत्या, म्हणून त्यांनी इजिप्तच्या राजाने सांगितल्याप्रमाणे केले नाही; तर मुलांनाही जिवंत राहू दिले.
Publicidade
निर्गम 1:15-17
OMRCV Marathi Contemporary Version
Em outras traduções
- IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi
15 मग मिसराचा राजा इब्री सुइणींशी बोलला. त्यांच्यातल्या एकीचे नाव शिप्रा व दुसरीचे पुवा असे होते. 16 तो म्हणाला, "तुम्ही इब्री स्त्रियांचे बाळंतपण करत असता, त्या प्रसूत होण्याच्या जागी त्या बसल्या म्हणजे नीट पाहा, आणि त्या स्त्रियांना मुलगी झाली तर तिला जिवंत ठेवा; परंतु त्यांना मुलगा झाला तर त्यास अवश्य मारून टाका." 17 परंतु त्या इब्री सुइणी देवाचे भय व आदर धरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या होत्या, म्हणून त्यांनी मिसरी राजाची आज्ञा मानली नाही; तर त्यांनी जन्मणाऱ्या मुलांनाही जिवंत ठेवले.
Direitos das traduções citadas
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.