नम्रतेप्रीत्यर्थ विनंती
3 आणि तुम्ही विरोधाने किंवा पोकळ अभिमानाने काही करू नका, पण मनाच्या लीनतेने आपल्यापेक्षा एकमेकांना मोठे मानावे. 4 तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्यांचेहि पाहा.
प्रभू येशूच्या नम्रतेचे व त्यागाचे उदाहरण
5 अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्याठायीही असो.