Pular para o conteúdo
Publicidade

पौलाचे गलतीकरांस पत्र 6:1-5

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

व्यवहारोपयोगी बोध

1 बंधूंनो, कोणी मनुष्य एखाद्या अपराधात सापडला, तर तुम्ही जे आत्मिक आहात ते त्यास सौम्यतेच्या आत्म्याने पुनःस्थापित आणा; तू स्वतःही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे. 2 तुम्ही एकमेकांची ओझी वाहा म्हणजे अशाने ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. 3 कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहोत असे मानतो, तो स्वतःला फसवतो. 4 पण प्रत्येकाने स्वतःच्या कामाची परीक्षा करावी आणि मग, त्यास दुसर्‍याच्या संबंधात नाही, पण केवळ आपल्यात अभिमानाला जागा मिळेल. 5 कारण प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    1 प्रिय बंधू व भगिनींनो, जर कोणी पापात सापडला, तर तुम्ही जे आत्मिक आहात त्या तुम्ही त्याला सौम्य रीतीने सुधारावे. तुम्ही स्वतःस सांभाळा, कदाचित तुम्हीही मोहात पडाल. 2 एकमेकांची ओझी वाहा, आणि अशा रीतीने ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. 3 आपण कोणी नसताना कोणी आहोत असा विचार करणारा स्वतःचीच फसगत करतो. 4 प्रत्येकाने आपल्या कृतींची परीक्षा करावी, कारण मगच त्याला स्वतःबद्दल आढ्यता बाळगता येईल आणि स्वतःची इतरांबरोबर तुलना करण्याची गरज वाटणार नाही. 5 आपल्यातील प्रत्येकाने आपापला भार वाहिला पाहिजे.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.