सर्वांचे भले करावे
1 प्रिय बंधू व भगिनींनो, जर कोणी पापात सापडला, तर तुम्ही जे आत्मिक आहात त्या तुम्ही त्याला सौम्य रीतीने सुधारावे. तुम्ही स्वतःस सांभाळा, कदाचित तुम्हीही मोहात पडाल. 2 एकमेकांची ओझी वाहा, आणि अशा रीतीने ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. 3 आपण कोणी नसताना कोणी आहोत असा विचार करणारा स्वतःचीच फसगत करतो. 4 प्रत्येकाने आपल्या कृतींची परीक्षा करावी, कारण मगच त्याला स्वतःबद्दल आढ्यता बाळगता येईल आणि स्वतःची इतरांबरोबर तुलना करण्याची गरज वाटणार नाही. 5 आपल्यातील प्रत्येकाने आपापला भार वाहिला पाहिजे.