6 परंतु अब्राम सारायला म्हणाला, "तू हागारेची मालकीण आहेस, तुला काय पाहिजे तसे तू तिचे कर." तेव्हा साराय तिच्याबरोबर निष्ठुरपणे वागू लागली म्हणून हागार तिला सोडून पळून गेली. 7 शूर गावाच्या वाटेवर वाळवंटातील एका पाण्याच्या झऱ्याजवळ हागार परमेश्वराच्या एका देवदूताला आढळली. 8 देवदूत तिला म्हणाला, "सारायचे दासी हागारे, तू येथे का आलीस? तू कोठे जात आहेस?" हागार म्हणाली, "माझी मालकीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे."