Publicidade

Jonas 2

ययोनाची उपकारस्तुतीची प्रार्थना

1 नंतर माशाच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली 2 तो म्हणाला,

"मी आपल्या आपत्तीमध्ये परमेश्वरास हाक मारली,

आणि त्याने मला उत्तर दिले;

मी मृत्यूलोकाच्या पोटातून मदतीकरता हाक मारली!

तू माझा आवाज ऐकलास.

3 तू मला समुद्रांच्या मध्यभागी खोल टाकले,

आणि प्रवाहाने मला वेढले,

तुझ्या सर्व उसळत्या लाटांचा कल्लोळ

माझ्यावरून गेला.

4 आणि मी म्हणालो, ‘मी तुझ्या दृष्टीसमोरून टाकलेला आहे;

तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावीन?’

5 जलांनी प्राण जाईपर्यंत मला झाकले;

आणि डोहाने सर्वबाजूनी मला घेरले,

समुद्रातील शेवाळाने माझ्या डोक्याला लपेटले.

6 मी पर्वतांच्या तळापर्यंत गेलो;

पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले;

तथापि माझ्या देवा परमेश्वरा, तू माझा जीव खड्डयातून वरती काढला आहे.

7 जेव्हा माझा जीव माझ्या ठायी व्याकुळ झाला; तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले,

आणि माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात पोहंचली.

8 जे निरर्थक मूर्तींकडे आपले चित्त लावतात,

ते स्वतः आपल्या दयानिधीला नाकारतात.

9 परंतु मी आभार मानण्याच्या वाणीने तुझ्याकडे यज्ञ अर्पण करीन;

जो नवस मी केला आहे तो मी पूर्ण करीन,

तारण परमेश्वराकडूनच आहे."

10 मग परमेश्वराने त्या मोठ्या माश्याला आज्ञा केली; तेव्हा त्याने योनाला कोरडया भूमीवर ओकून टाकले.

Veja também

Publicidade
Jonas
Ver todos os capítulos de Jonas
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-15_21-32-39-