4 मी पृथ्वी निर्माण केली तेव्हा तू कुठे होतास?
तू स्वत:ला इतका शहाणा समजत असशील तर मला उत्तर दे.
5 जग इतके मोठे असावे हे कोणी ठरवले ते सांग?
मोजण्याच्या दोरीने ते कोणी मोजले का?
6 तीचा पाया कशावर घातला आहे?
तिची कोनशिला कोणी ठेवली?
7 जेव्हा ते घडले तेव्हा पहाटेच्या ताऱ्यांनी गायन केले
आणि देवपुत्रांनी आनंदाने जयजयकार केला.
8 जेव्हा समुद्र पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडला
तेव्हा दरवाजे बंद करून त्यास कोणी अडवला?
9 त्यावेळी मी त्यास मेघांनी झाकले
आणि काळोखात गुंडाळले.
10 मी समुद्राला मर्यादा घातल्या
आणि त्यास कुलुपांनी बंद केलेल्या दरवाजाबाहेर थोपविले.
11 मी म्हणालो, तू इथपर्यंतच येऊ शकतोस या पलिकडे मात्र नाही.
तुझ्या उन्मत्त लाटा इथेच थांबतील.