Publicidade

Jó 25

देवापुढे मानव न्यायी ठरत नाही असे बिल्ददचे म्हणणे

1 नंतर बिल्दद शूहीने उत्तर दिले व तो म्हणाला,

2 "अधीकार चालवणे व भीती दाखवणे हे देवाकडेच आहे,

तो स्वर्गाच्या उच्च स्थानामध्ये शांती राखतो.

3 त्याच्या सैन्याची मोजणी करीता येईल काय?

कोणावर त्याचा प्रकाश पडत नाही?

4 मनुष्य देवापुढे नितीमान कसा ठरेल?

स्त्रीपासुन जन्मलेला निर्मळ कसा ठरेल, व त्यास स्विकारले जाईल.

5 पाहा, त्याच्या दृष्टीने चंद्र सुध्दा तेजोमय नाही.

त्याच्या दृष्टीला तारे देखील पवित्र वाटत नाहीत.

6 मग मनुष्य किती कमी आहे, एखाद्या अळीप्रमाणे आहे. तो जंतूप्रमाणे आहे."

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-19_11-20-24-