12 पण मनुष्यास शहाणपण कुठे मिळेल?
समजूतदारपणा शोधण्यासाठी आपल्याला कुठे जावे लागेल?
13 शहाणपण किती मोलाचे आहे हे मनुष्याला कळत नाही,
पृथ्वीवरचे लोक जमीन खणून शहाणपण शोधू शकत नाहीत.
14 पृथ्वीवरील मोठे खोल जलाशय असे म्हणते, ‘माझ्यामध्ये ते नाही.’
सागर म्हणतो, ‘माझ्याजवळीही ते नाही.’
15 तुम्ही सोने देऊन ते विकत घेऊ शकत नाही,
ते विकत घेण्यासाठी जगात तेवढी चांदी नाही.
16 तुम्ही ओफीरच्या सोन्याने किंवा मौल्यवान गोमेद
किंवा नीलमण्याने शहाणपण विकत घेऊ शकत नाही.
17 शहाणपण सोन्यापेक्षा किंवा स्फटिकापेक्षा मौल्यवान असते,
सोन्यात जडवलेले मौल्यवान खडेही शहाणपण विकत घेऊ शकत नाही.
18 शहाणपण पोवळ्यापेक्षा व स्फटिकापेक्षाही मौल्यवान आहे,
माणकापेक्षा ही त्याचे मोल अधिक आहे.
19 इथिओपियातील (कूश) पीतमणी त्याच्या बरोबरीचा नाही,
शुध्द सोन्याने तुम्ही तो विकत घेऊ शकत नाही.
20 मग शहाणपणा कुठून येते?
समजूतदारपणा आपल्याला कुठे मिळेल?
21 पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राण्यापासून शहाणपण लपवून ठेवले आहे,
आकाशातले पक्षीसुध्दा ते बघू शकत नाहीत.
22 मृत्यू आणि विनाश म्हणतात, ‘आम्हास शहाणपण सापडले नाही,
आम्ही त्याबद्दलच्या फक्त अफवाच ऐकल्या आहेत.’