देवापुढे ईयोब निरुत्तर होतो
1 मग ईयोब उत्तर देऊन म्हणाला,
2 "तू जे काही म्हणत आहेस ते खरे असल्याची जाणीव मला आहे, परंतु देवापुढे मनुष्य कसा बरोबर ठरेल?
3 मनुष्य देवाशी वाद घालू शकत नाही. देव हजार प्रश्न विचारु शकतो आणि मनुष्यास त्याच्या एकाही प्रश्नाचे उत्तर देता येत नाही.
4 देव खूप विद्वान आहे आणि त्याची शक्ती अमर्याद आहे. देवाचे मन कठीण करून कोण निभावेल?