17 ते सत्तर लोक आनंदाने परतले आणि म्हणाले, "प्रभू, तुझ्या नावाने भूतेसुद्धा आम्हास वश होतात!" 18 तेव्हा तो त्यांना म्हणाला, "मी सैतानाला आकाशातून विजेसारखे पडताना पाहिले! 19 पाहा, मी तुम्हास साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे आणि कशानेच तुम्हास अपाय होणार नाही. 20 तथापि तुम्हास दुष्ट आत्मे वश होतात याचा आनंद मानू नका तर तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत याचा आनंद माना."
मत्त. 11:25-27