Pular para o conteúdo
Publicidade

लूक 10:17-20

OMRCV Marathi Contemporary Version

17 नंतर ते बाहत्तर आनंदाने परतले आले आणि म्हणाले, "प्रभूजी, तुमच्या नावाने भुतेदेखील वश होतात."

18 त्यांनी उत्तर दिले, "मी सैतानाला स्वर्गातून वीज कोसळावी तसे कोसळताना पाहिले. 19 मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवून टाकण्याचे आणि शत्रूवर विजयी होण्याचे सामर्थ्य दिले आहे; तुम्हाला इजा होणार नाही. 20 तरीपण दुष्टात्मे तुमची आज्ञा पाळतात, या गोष्टींचा आनंद करण्यापेक्षा तुमची नावे स्वर्गात नोंदली गेली आहेत याचा आनंद करा."

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    17 ते सत्तर लोक आनंदाने परतले आणि म्हणाले, "प्रभू, तुझ्या नावाने भूतेसुद्धा आम्हास वश होतात!" 18 तेव्हा तो त्यांना म्हणाला, "मी सैतानाला आकाशातून विजेसारखे पडताना पाहिले! 19 पाहा, मी तुम्हास साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे आणि कशानेच तुम्हास अपाय होणार नाही. 20 तथापि तुम्हास दुष्ट आत्मे वश होतात याचा आनंद मानू नका तर तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत याचा आनंद माना."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.