संमक्षतेची भाकर
5 तू मैदा घेऊन त्याच्या बारा पोळ्या भाज; एक पोळी दोन दशमांश एफाभर सपिठाची करावी. 6 त्यांच्या दोन रांगा करून एका रांगेत सहा सहा पोव्व्या शुद्ध सोन्याच्या मेजावर परमेश्वरासमोर ठेवाव्यात.
7 प्रत्येक रांगेवर धूप ठेव ह्यामुळे परमेश्वरास अग्नींतून केलेल्या अर्पणाचे ते प्रतीक असेल. 8 प्रत्येक शब्बाथ दिवशी अहरोनाने त्या, परमेश्वरासमोर मांडाव्या; इस्राएल लोकांच्या वतीने हा सर्वकाळचा करार होय. 9 ती भाकर अहरोन व त्याचे पुत्र ह्यांचा कायमचा वाटा होय; त्यांनी ती पवित्र ठिकाणी खावी; कारण कायमच्या नियमाप्रमाणे परमेश्वरास अर्पिलेल्या अर्पणांपैकी ती त्यास परमपवित्र होय."