5 "सपीठ घ्यावे आणि त्याच्या बारा भाकरी तयार कराव्या, प्रत्येक भाकरीसाठी दोन दशांश एफा24:5 अंदाजे 3.2 कि.ग्रॅ. वापरावा. 6 त्यांच्या दोन रांगा आणि प्रत्येक रांगेत सहा भाकरी शुद्ध सोन्याच्या मेजावर मांडून याहवेहसमोर ठेवाव्यात. 7 प्रत्येक रांगेभोवती स्मरणभाग म्हणून शुद्ध धूप टाकावा, याचे प्रतीक म्हणून भाकर आणि अन्नार्पण हे याहवेहसाठी अर्पण करावी. 8 ही भाकर याहवेहसमोर नियमितपणे मांडून ठेवावी, शब्बाथानंतर शब्बाथ, इस्राएली लोकांसाठी हा शाश्वत करार आहे. 9 या भाकरी अहरोन व त्याच्या पुत्रांचा वाटा होय, ज्या त्यांनी पवित्रस्थानात बसून खाव्यात; कारण याहवेहला अर्पण केल्या जाणार्या यज्ञातील हा परमपवित्र भाग आहे. त्याचा त्यावर कायमचा अधिकार आहे."
Publicidade
लेवीय 24:5-9
OMRCV Marathi Contemporary Version
Em outras traduções
- IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi
5 तू मैदा घेऊन त्याच्या बारा पोळ्या भाज; एक पोळी दोन दशमांश एफाभर सपिठाची करावी. 6 त्यांच्या दोन रांगा करून एका रांगेत सहा सहा पोव्व्या शुद्ध सोन्याच्या मेजावर परमेश्वरासमोर ठेवाव्यात.
7 प्रत्येक रांगेवर धूप ठेव ह्यामुळे परमेश्वरास अग्नींतून केलेल्या अर्पणाचे ते प्रतीक असेल. 8 प्रत्येक शब्बाथ दिवशी अहरोनाने त्या, परमेश्वरासमोर मांडाव्या; इस्राएल लोकांच्या वतीने हा सर्वकाळचा करार होय. 9 ती भाकर अहरोन व त्याचे पुत्र ह्यांचा कायमचा वाटा होय; त्यांनी ती पवित्र ठिकाणी खावी; कारण कायमच्या नियमाप्रमाणे परमेश्वरास अर्पिलेल्या अर्पणांपैकी ती त्यास परमपवित्र होय."
Direitos das traduções citadas
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.