6 येशू त्यांना म्हणाला, "यशयाने जेव्हा तुम्हा ढोंगी लोकांविषयी भविष्य केले तेव्हा त्याचे बरोबरच होते. यशया लिहितो,
‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात
परंतु त्याची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत.
7 ते व्यर्थ माझी उपासना करतात
कारण ते लोकांस शास्त्र म्हणून जे शिकवतात ते मनुष्यांनी केलेले नियम असतात.’
8 तुम्ही देवाच्या आज्ञांचा त्याग केला असून, आता तुम्ही मनुष्याची परंपरा पाळत आहात."