17 म्हणून तुमचे मत आम्हास सांगा, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?" 18 येशूला त्यांचा दुष्ट उद्देश माहीत होता, म्हणून तो म्हणाला, "ढोंग्यांनो, तुम्ही माझी परीक्षा का घेत आहात? 19 कर भरण्यासाठी जे नाणे वापरले जाते ते मला दाखवा." त्या लोकांनी येशूला चांदीचे एक नाणे दाखविले. 20 तेव्हा येशूने विचारले, "या नाण्यावर कोणाचे चित्र आणि नाव लिहिलेले आहे?" 21 त्या लोकांनी उत्तर दिले, "कैसराचे." यावर येशू त्यांना म्हणाला, "जे कैसराचे आहे ते कैसराला द्या आणि जे देवाचे आहे ते देवाला द्या."
Publicidade