31 ‘आम्ही काय खावे’ किंवा ‘काय प्यावे’, अथवा ‘आम्ही काय पांघरावे’ असे म्हणून काळजीत करु नका.
32 कारण या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय करत असतात, कारण तुमच्या स्वर्गातील पित्याला तुम्हास या गोष्टींची गरज आहे हे ठाऊक आहे. 33 तर पहिल्याने तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हास मिळतील.
34 म्हणून उद्याची चिंता करू नका कारण प्रत्येक दिवस काही ना काही चिंता घेऊनच उगवतो. म्हणून उद्याची चिंता उद्या स्वतः करेल. ज्या दिवसाचे जे दुःख ते त्या दिवसासाठी पुरेसे आहे.