Pular para o conteúdo
Publicidade

मत्तय 6:31-34

OMRCV Marathi Contemporary Version

31 म्हणून ‘आम्ही काय खाणार?’ किंवा ‘आम्ही काय पिणार?’ किंवा ‘आम्ही काय पांघरावे?’ असे म्हणत काळजी करू नका. 32 कारण परकीय लोक6:32 परकीय लोक म्हणजे ज्यांना जिवंत परमेश्वर माहीत नाही या गोष्टींच्या मागे लागतात, आणि तुम्हाला या गोष्टींची गरज आहे, हे तुमच्या स्वर्गातील पित्याला माहीत आहे. 33 परंतु तुम्ही प्रथम त्यांचे राज्य आणि नीतिमत्व मिळविण्यासाठी झटा म्हणजे या सर्व गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतील. 34 म्हणून उद्याच्या गोष्टींची चिंता करू नका, उद्याची चिंता उद्या, प्रत्येक दिवसाचा त्रास त्या दिवसासाठी पुरेसा आहे.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    31 ‘आम्ही काय खावे’ किंवा ‘काय प्यावे’, अथवा ‘आम्ही काय पांघरावे’ असे म्हणून काळजीत करु नका.

    32 कारण या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय करत असतात, कारण तुमच्या स्वर्गातील पित्याला तुम्हास या गोष्टींची गरज आहे हे ठाऊक आहे. 33 तर पहिल्याने तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हास मिळतील.

    34 म्हणून उद्याची चिंता करू नका कारण प्रत्येक दिवस काही ना काही चिंता घेऊनच उगवतो. म्हणून उद्याची चिंता उद्या स्वतः करेल. ज्या दिवसाचे जे दुःख ते त्या दिवसासाठी पुरेसे आहे.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.