4 यावर राजा मला म्हणाला, "तुझ्यासाठी मी काय करावे असे तुला वाटते?" मी स्वर्गातील देवाची प्रार्थना केली. 5 मग मी राजाला उत्तर दिले, "महाराजांची मर्जी असेल आणि आपल्या दासावर आपली कृपादृष्टी झाली असेल तर मला माझ्या पूर्वजांच्या कबरी जेथे आहेत त्या यहूदातील यरूशलेमास जाऊन नगराची पुन्हा बांधणी करण्यास पाठवा."