2 तेव्हा सनबल्लट आणि गेशेम यांनी मला असा निरोप पाठवला की, "नहेम्या, ये. आपण एकमेकांना ओनोच्या मैदानातल्या एखाद्या गावात एकत्र भेटू." पण त्यांचा हेतू मला इजा करण्याचा होता.
3 तेव्हा मी माझ्या निरोप्यांमार्फत असा निरोप पाठवला की, "एका महत्वाच्या कामात असल्यामुळे मी खाली येऊ शकत नाही. तुम्हास भेटायला आल्यामुळे काम थांबावे असे मला वाटत नाही." 4 सनबल्लट आणि गेशेम यांनी हाच निरोप माझ्याकडे चार वेळा पाठवला. आणि मी ही त्यांना प्रत्येक वेळी हेच उत्तर पाठवले. 6 त्यामध्ये असे लिहीले होते.
राष्ट्रांमध्ये एक अफवा पसरली आहे आणि गेशेमही हेच म्हणत आहे की, तू आणि यहूदी मिळून राजाविरुध्द बंड करायच्या बेतात आहात. म्हणूनच तुम्ही यरूशलेमेच्या तटबंदीची बांधकामे करत आहात. तू यहूदी लोकांचा नवा राजा होणार अशी अफवा आहे.
8 तेव्हा मी सनबल्लटाला उलट उत्तर पाठवले की, "तू म्हणतोस तसे काही चाललेले नाही. या केवळ तुझ्याच मनातल्या कल्पना आहेत." 9 आमचे शत्रू आम्हास भीती दाखवायचा प्रयत्न करत होते. ते मनात म्हणत होते, "यहूदी घाबरतील आणि काम चालू ठेवण्याची उमेद त्यांच्यात राहणार नाही आणि भिंतीचे काम पुरे होणार नाही." मग मी प्रार्थना केली, "देवा, मला बळ दे."