Pular para o conteúdo
Publicidade

नहेम्याह 6:2-4,6,8,9

OMRCV Marathi Contemporary Version

2 तेव्हा सनबल्लट व गेशेम यांनी मला असा निरोप पाठविला, "ये, आपण ओनोच्या मैदानातील एका खेडेगावात6:2 किंवा केफिरीम भेटू या."

पण ते मला दुखापत करण्याचा कट करीत असल्याचे मला समजले, 3 म्हणून मी त्यांच्याकडे उलट हा निरोप पाठविला: "मी एक महान कार्य करीत आहे; ते कार्य थांबवून मी तुमच्या भेटीला का यावे?" 4 त्यांनी चार वेळा मला तो निरोप पाठविला आणि प्रत्येक वेळी मी तेच उत्तर दिले.

6 त्या पत्रात असा मजकूर होता:

"देशादेशात असे ऐकिवात येत आहे की—गेशेमचे म्हणणे आहे की हे सत्य आहे की, यहूदी लोक बंड करण्याची योजना आखीत आहेत आणि त्यासाठीच तू हा तट बांधत आहेस. असेही म्हटले जाते की तू त्यांचा राजा बनणार आहेस,

8 तेव्हा मी त्याला असे उत्तर पाठविले, "तू जे काही बोलत आहेस त्यातील काहीही घडणार नाही; या सर्व तुझ्या कल्पनेतील गोष्टी आहेत."

9 "यामुळे त्यांच्या हातातील शक्ती गळून पडेल व ते त्यांचे काम पूर्ण करू शकणार नाहीत" असा विचार करून ते आम्हाला भीती दाखविण्याचा प्रयत्न करीत होते.

पण मी प्रार्थना केली, "आता माझे बाहू बळकट करा."

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    2 तेव्हा सनबल्लट आणि गेशेम यांनी मला असा निरोप पाठवला की, "नहेम्या, ये. आपण एकमेकांना ओनोच्या मैदानातल्या एखाद्या गावात एकत्र भेटू." पण त्यांचा हेतू मला इजा करण्याचा होता.

    3 तेव्हा मी माझ्या निरोप्यांमार्फत असा निरोप पाठवला की, "एका महत्वाच्या कामात असल्यामुळे मी खाली येऊ शकत नाही. तुम्हास भेटायला आल्यामुळे काम थांबावे असे मला वाटत नाही." 4 सनबल्लट आणि गेशेम यांनी हाच निरोप माझ्याकडे चार वेळा पाठवला. आणि मी ही त्यांना प्रत्येक वेळी हेच उत्तर पाठवले. 6 त्यामध्ये असे लिहीले होते.

    राष्ट्रांमध्ये एक अफवा पसरली आहे आणि गेशेमही हेच म्हणत आहे की, तू आणि यहूदी मिळून राजाविरुध्द बंड करायच्या बेतात आहात. म्हणूनच तुम्ही यरूशलेमेच्या तटबंदीची बांधकामे करत आहात. तू यहूदी लोकांचा नवा राजा होणार अशी अफवा आहे.

    8 तेव्हा मी सनबल्लटाला उलट उत्तर पाठवले की, "तू म्हणतोस तसे काही चाललेले नाही. या केवळ तुझ्याच मनातल्या कल्पना आहेत." 9 आमचे शत्रू आम्हास भीती दाखवायचा प्रयत्न करत होते. ते मनात म्हणत होते, "यहूदी घाबरतील आणि काम चालू ठेवण्याची उमेद त्यांच्यात राहणार नाही आणि भिंतीचे काम पुरे होणार नाही." मग मी प्रार्थना केली, "देवा, मला बळ दे."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.