Pular para o conteúdo
Publicidade

गणना 12:1-3,8

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

मिर्याम आणि अहरोन मोशेविरुद्ध कुरकुर करतात

1 मग मिर्याम व अहरोन मोशेविरूद्ध बोलू लागले. कारण त्याने एका कुशी-स्त्रीशी लग्न केले. 2 ते म्हणाले, "परमेश्वर फक्त मोशेबरोबरच बोलला काय? तो आमच्याबरोबरही बोलला नाही काय? आता परमेश्वराने ते जे काय बोलले ते ऐकले." 3 आता पृथ्वीवरील कोणत्याही मनुष्यापेक्षा मोशे अधिक नम्र होता.

8 मी त्याच्याशी समोरासमोर बोलतो. दृष्टांताने किंवा कोड्यानी बोलत नाही.

तो माझे स्वरूप पाहत असतो.

तर असे असताना माझा सेवक मोशे ह्याच्या विरूद्ध बोलताना तुम्हास भीती कशी वाटली नाही?

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    1 मोशेच्या कूशी पत्नीमुळे मिर्याम आणि अहरोन मोशेच्या विरुद्ध बोलू लागले, कारण त्याने कूशी देशातील एका स्त्रीशी विवाह केला होता. 2 त्यांनी विचारले, "याहवेह मोशेद्वारेच बोलले आहेत काय? याहवेह आमच्याद्वारे सुद्धा बोलले नाहीत काय?" आणि याहवेहने हे ऐकले.

    3 (मोशे तर अतिशय नम्र मनुष्य होता, भूतलावरील इतर लोकांपेक्षा अधिक नम्र होता.)

    8 मी त्याच्याशी कोड्यात नाही,

    तर समोरासमोर स्पष्टपणे बोलतो;

    तो याहवेहचे रूप पाहतो.

    माझा सेवक मोशे याच्याविरुद्ध बोलण्यास

    तुम्हाला भीती का वाटली नाही?"

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.