मिर्याम व अहरोनाचा मोशेला विरोध
1 मोशेच्या कूशी पत्नीमुळे मिर्याम आणि अहरोन मोशेच्या विरुद्ध बोलू लागले, कारण त्याने कूशी देशातील एका स्त्रीशी विवाह केला होता. 2 त्यांनी विचारले, "याहवेह मोशेद्वारेच बोलले आहेत काय? याहवेह आमच्याद्वारे सुद्धा बोलले नाहीत काय?" आणि याहवेहने हे ऐकले.
3 (मोशे तर अतिशय नम्र मनुष्य होता, भूतलावरील इतर लोकांपेक्षा अधिक नम्र होता.)
8 मी त्याच्याशी कोड्यात नाही,
तर समोरासमोर स्पष्टपणे बोलतो;
तो याहवेहचे रूप पाहतो.
माझा सेवक मोशे याच्याविरुद्ध बोलण्यास
तुम्हाला भीती का वाटली नाही?"