Pular para o conteúdo
Publicidade

गणना 6:22-27

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

याजकांनी द्यायचा आशीर्वाद

22 पुन्हा परमेश्वर मोशेशी बोलला, तो म्हणाला, 23 अहरोन व त्याच्या मुलांशी बोल. म्हण, तू इस्राएल लोकांस ह्याप्रमाणे आशीर्वाद द्या. तुम्ही त्यांना म्हणावे.

24 परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो.

25 परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो, तुझ्याकडे पाहो व तुजवर दया करो.

26 परमेश्वर आपल्या प्रसन्नमुखासह तुजकडे पाहो व तुला शांती देवो.

27 याप्रमाणे त्यांनी माझे नाव इस्राएल लोकांस द्यावे. मग मी त्यांना आशीर्वाद देईन.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    22 याहवेह मोशेला म्हणाले, 23 अहरोन आणि त्याच्या पुत्रांना सांग, "तुम्ही इस्राएली लोकांस आशीर्वाद देतांना असे म्हणावे:

    24 " ‘ "याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो

    आणि तुमचे संरक्षण करो;

    25 याहवेह आपला मुखप्रकाश तुमच्यावर पाडो

    आणि तुमच्यावर कृपा करो;

    26 याहवेह आपले मुख तुमच्याकडे लावो,

    आणि तुम्हाला शांती देवो." ’

    27 "अशा रीतीने ते माझे नाव इस्राएली लोकांना ठेवतील आणि मी त्यांना आशीर्वादित करेन."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.