याजकीय आशीर्वाद
22 याहवेह मोशेला म्हणाले, 23 अहरोन आणि त्याच्या पुत्रांना सांग, "तुम्ही इस्राएली लोकांस आशीर्वाद देतांना असे म्हणावे:
24 " ‘ "याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो
आणि तुमचे संरक्षण करो;
25 याहवेह आपला मुखप्रकाश तुमच्यावर पाडो
आणि तुमच्यावर कृपा करो;
26 याहवेह आपले मुख तुमच्याकडे लावो,
आणि तुम्हाला शांती देवो." ’
27 "अशा रीतीने ते माझे नाव इस्राएली लोकांना ठेवतील आणि मी त्यांना आशीर्वादित करेन."