Pular para o conteúdo
Publicidade

होशेय 1

होशेयची जारिणी पत्नी व तिची मुले

1 होशेय, जो बैरीचा मुलगा यास परमेश्वराचा संदेश मिळाला. त्यावेळी उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया हे यहूदाचे राजे होते आणि इस्राएलमध्ये योवाशाचा मुलगा यराबाम राज्य करीत होता. 2 हा परमेश्वराचा होशेयला आलेला पहिलाच संदेश होता, तो होशेयला म्हणाला,

"जा एका वेश्येसोबत लग्न कर व जी मुले होतील

ती तिच्या जारकर्माचे परिणाम असतील

कारण परमेश्वराचा त्याग करणे

हे जारकर्म हा देश करीत आहे."

3 म्हणून होशेयने ने दिब्लाइमाची मुलगी गोमर हिच्याशी लग्न केले. ती गरोदर राहिली व तिला मुलगा झाला. 4 परमेश्वर होशेयला म्हणाला,

त्याचे नाव इज्रेलअर्थ-परमेश्वर विखरतो ठेव,

कारण काही वेळानंतर

मी येहूच्या घराण्याला

त्यांनी इज्रेल येथे केलेल्या रक्तपातामुळेइज्रेल शहरामध्ये येहुने इस्राएलचा राजा आणि राजघराण्यातील त्याच्या सर्व लोकांचा खून केला, आणि नवीन राज्याचा पहिला राजा बनला - 2 राजे 9-10 पहा. शिक्षा करणार आहे

व इस्राएल घराण्याच्या राज्याचा शेवट करणार आहे.

5 त्या दिवशी

मी इज्रेलच्या दरीत इस्राएलचे धनुष्य मोडेन.

6 गोमर पुन्हा गरोदर झाली आणि तिला मुलगी झाली

तेव्हा परमेश्वर होशेय ला म्हणाला

हिचे नांव लो-रुहामाअर्थ-दया नसणारा ठेव

कारण यापुढे मी इस्राएल राष्ट्रावर दया

करणार नाही व त्यास क्षमा करणार नाही.

7 तरीही मी यहूदाच्या घराण्यावर दया करीन

मी परमेश्वर त्यांना धनुष्य, तलवार, लढाई,

घोडे किंवा घोडेस्वार यांच्या बळाने नाही

तर त्यांना स्वबळाने सोडवेन.

8 मग लो-रुहामाचे दुध तुटल्यावर गोमर गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. 9 मग परमेश्वर म्हणाला,

त्याचे नांव लो-अम्मी ठेव,

कारण तुम्ही माझे लोक नाही

आणि मी तुमचा देव नाही.

10 जरी इस्राएलच्या लोकांची संख्या

समुद्राच्या वाळूकणांसारखी असेल

जी मोजता येत नाही

हे असे घडेल की,

जिथे तुम्ही माझे लोक नव्हते

तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र असे म्हणतील.

11 यहूदाचे लोक व इस्राएलचे

लोक एकत्र येऊन आपणावर

एक पुढारी नेमतील

व त्या देशातून निघून येतील

तेव्हा इज्रेलाचा दिवस महान होईल.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.