पवित्र आत्म्याप्रमाणे चालणे
1 म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असणाऱ्यांना दंडाज्ञा नाही. ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात. 2 कारण, ख्रिस्त येशूतील जीवनाच्या पवित्र आत्म्याच्या नियमाने मला पापाच्या व मरणाच्या नियमातून मुक्त केले. 3 कारण देहामुळे नियमशास्त्र दुर्बळ झाल्याने त्यास जे अशक्य झाले, त्यासाठी देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापासाठी पापमय देहाचे रूप देऊन पाठवले व पापाला देहात दंडाज्ञा ठरविली. 4 म्हणजे आपण जे देहाला अनुसरून नाही पण आत्म्याला अनुसरून चालणारे आहोत त्या आपल्यात नियमशास्त्राची आज्ञा पूर्ण व्हावी.