3 तर त्यांना असे सांग, सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो:
"तुम्ही माझ्याकडे फिरा!" हे सैन्यांच्या परमेश्वराचे वचन आहे;
"म्हणजे मी तुमच्याकडे फिरेन." असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
4 संदेष्टे तुमच्या पूर्वजांना पूर्वी संदेश देत म्हणाले, "सैन्याचा देव असे म्हणतो: आपल्या दुष्ट मार्गांपासून आणि वाईट चालीरितींपासून वळा!" परंतु त्यांनी ऐकले नाही आणि माझ्याकडे लक्ष दिले नाही. त्या पूर्वजांसारखे होऊ नका. ही परमेश्वराची वाणी होय.
5 "तुमचे पूर्वज, कोठे आहेत? आणि संदेष्टे देखील सर्वकाळाकरता येथे राहतील काय?
6 परंतु मी माझ्या ज्या वचनांनी आणि माझ्या ज्या नियमांनी माझे दास, जे माझे संदेष्टे त्यांना आज्ञापिले,
ती तुमच्या पूर्वजांवर आली नाहीत काय?"
तेव्हा त्यांनी पश्चाताप केला व म्हणाले, "सेनाधीश परमेश्वराच्या योजना या त्याचे वचन आणि त्याची कामे यांच्यानुसार आहेत, त्या त्याने पूर्णतेस नेल्या आहेत."