Pular para o conteúdo
Publicidade

जखर्‍याह 1:3-6

OMRCV Marathi Contemporary Version

3 म्हणून लोकांना सांग: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘तुम्ही माझ्याकडे परत या आणि मी तुम्हाकडे परत येईन,’ सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात. 4 तुमच्या पूर्वजांसारखे तुम्ही होऊ नका, ज्यांना पूर्वीच्या संदेष्ट्यांनी घोषणा केली: ‘आपल्या दुष्ट मार्गापासून व दुष्ट प्रथांपासून मागे वळा.’ पण त्यांनी माझे ऐकले नाही वा त्याच्याकडे लक्ष दिले नाही, याहवेह जाहीर करतात. 5 तुमचे पूर्वज कुठे आहेत? आणि संदेष्टे, ते कायमचे जगतात का? 6 पण माझी वचने व माझे नियम जे मी माझ्या सेवक संदेष्ट्यांना आज्ञापिले होते, त्यांनी तुमच्या पूर्वजांना मागे टाकले आहे ना?

"तेव्हा त्यांनी पश्चात्ताप केला व ते म्हणाले, ‘आमचे वागणे व प्रथांमुळे याहवेहकडून आम्हाला जी शिक्षा मिळाली, त्यास आम्ही पात्र आहोत. जी करण्याचा त्यांनी निर्धार केला होता.’ "

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    3 तर त्यांना असे सांग, सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो:

    "तुम्ही माझ्याकडे फिरा!" हे सैन्यांच्या परमेश्वराचे वचन आहे;

    "म्हणजे मी तुमच्याकडे फिरेन." असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

    4 संदेष्टे तुमच्या पूर्वजांना पूर्वी संदेश देत म्हणाले, "सैन्याचा देव असे म्हणतो: आपल्या दुष्ट मार्गांपासून आणि वाईट चालीरितींपासून वळा!" परंतु त्यांनी ऐकले नाही आणि माझ्याकडे लक्ष दिले नाही. त्या पूर्वजांसारखे होऊ नका. ही परमेश्वराची वाणी होय.

    5 "तुमचे पूर्वज, कोठे आहेत? आणि संदेष्टे देखील सर्वकाळाकरता येथे राहतील काय?

    6 परंतु मी माझ्या ज्या वचनांनी आणि माझ्या ज्या नियमांनी माझे दास, जे माझे संदेष्टे त्यांना आज्ञापिले,

    ती तुमच्या पूर्वजांवर आली नाहीत काय?"

    तेव्हा त्यांनी पश्चाताप केला व म्हणाले, "सेनाधीश परमेश्वराच्या योजना या त्याचे वचन आणि त्याची कामे यांच्यानुसार आहेत, त्या त्याने पूर्णतेस नेल्या आहेत."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.